किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार? वाचन वेळ : ८ मिनिटं
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhq_S5stH9sxz_rurH1XM1RU_OTKGe2K3sTyq83PIdmA92_GSpx0YQN83_3YkHpov0AmcXnS8SNvjHGZ3_rwPDrMThZb8_uI0EvOhdXL8g48Zy4DCXpcN3reYlBkhRvJre9ND_1_hKPrNM/s1600/main-adfaf.jpg)
किम जोंग उन गेले, तर उत्तर कोरियाचा वारसदार कोण होणार? लेखन :-कृष्णा बोर्डे वाचन वेळ : ८ मिनिटं गेल्या महिनाभर जगभराचा मीडिया कोरोनाच्या बातम्यांनी व्यापला असताना अचानक एका बातमीनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय. पृथ्वीवरचा नरक अशी ओळख असलेल्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या बातमीनं खळबळ उडालीय. यात किम जोंग उन कोमात गेल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळं आता किम यांचा वारसदार कोण याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. हिटलर, स्टॅलिन, बगदादी यांच्यासारख्या क्रुरकर्मा नेत्यांची आठवण करून देणारे उत्तर कोरियाचे ३६ वर्षांचे हुकूमशहा किम जोंग उन हे लहरीपणा, विक्षिप्तपणामुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या दुष्टपणाच्या खऱ्या खोट्या कथा न्यूजचॅनलमुळं भारतातली लहानसहान मुलंही चघळत असतात. मात्र आता हेच किम मरणाच्या दारात उभे असल्याची खबर आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथल्या डेली एनके या वेबसाईटनं दिलेल्या एका बातमीनुसार, किम जोंग उन यांची १२ एप्रिलला हर्ट सर्जरी झाली होती. पण त्यातून बाहेर पडण्याऐवजी त्यांची प्रकृती अजूनच खराब झालीय. त्यामुळं जगभरात उल...