एक यशस्वी आणि स्मार्ट बिजनेस मेन बनण्यासाठी व्यसनापासून तरुणाला खुप काळजी घेतली पाहिजे त्या संबधित हां ब्लॉग.
व्यसनाधीनता
अणि तरुण
एक यशस्वी आणि स्मार्ट बिजनेस
मेन बनण्यासाठी व्यसनापासून
तरुणाला खुप काळजी घेतली पाहिजे त्या
संबधित हां ब्लॉग.
बाकीच्या जगाचे प्रश्न, प्रोब्लेम्स, कटकटी
जरा ठेवू बाजूला....
आणि जरा थेट स्वत:कड़े
पाहु......
दोन किलोमीटर धावत जायची ताकद नाही आपल्यात, आपण काय मोठेमोठे स्वप्न पाहतो ? तब्बेत काय आपली ? यू आर अँज यू ईट...आशी इंग्रजीत एक म्हण आहे.
म्हणजे काय तर तुम्ही जसे अन्न खाता, तुमचे विचार तुमचे व्यक्ति महत्व ही तसेच बनत जाते .... आणि आपण काय खातों ?काय व्यसन करतो ? सिगारेट,दारू,बियर, तंभाखू गुटखा, पान मसाला आणि चरस, सतत कोल्ड्रिंग्स आणि रात्रि आजुन ही कही बाही.या सर्व व्यसनांमुळेच तरुण पिढ़ी
वाया जात आहे. मग कुरकुर नाही करणार आपली तब्बेत तर दुसरं काय ? सतत काही ना काही दुखतं , खपतं कुणाचं वजन प्रचंड वाढून नुसता कनकेचा गोळा झालाय, तर कुणी
एकदम सुकड़ा बोंबील ?
एक निरोगी व्यक्ती दिवसातून २० हजार वेळा श्वास
घेतो. आपल्या शरीरामध्ये आलेला श्वास शुद्ध करण्याचे काम आपली फुफुसे करतात. बिडी, सिगारेटच्या धुरामुळे आपल्या शरीरातील फुफुसे व हृदय या महत्वाच्या अवयवांवर
खूप मोठ्या प्रमाणात आघात होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO-World Health Organization) म्हणण्यानुसार रोज होणाऱ्या १० मृत्यूंपैकी १
मृत्यू बिडी-सिगरेट, तंबाखूमुळे होतो. दरवर्षी जवळ-जवळ ७० लाख लोक धुम्रपानामुळे व तंबाखूच्या
सेवनामुळे मृत्युमुखी पडतात.तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घटक पदार्थ असतो. निकोटीन असा पदार्थ आहे कि व्यक्ती हळूहळू याचे आधिन जातो. जेंव्हा व्यक्ती
सिगारेट पिणे सुरु करतो त्यानंतर दिवसोंदिवस निकोटिनच्या डोस बाबत त्याच्या
मेंदूची क्षमता वाढत जाते. मेंदू स्वतःला या निकोटीनच्या एवढा अनुकूल करतो कि
पहिल्यांदा जर तो व्यक्ती एक सिगारेट पीत असेल तर हळूहळू दोन, चार, सहा नंतर एक पॅकेट, दोन पॅकेट अशा प्रमाणात वाढत जाते. निकोटीन आपल्या मेंदूवर पूर्ण ताबा मिळवते
व नंतर आपल्या सवयीचे रूपांतर आपल्या गरजेत होते.
धुम्रपान ही हल्ली फॅशन बनली आहे. अनुकरणातून लागलेली ही सवय अतिशय धोकादायक आहे. धुम्रपान केल्याने आजपर्यंत कोणाचे ही भले झालेले नाही. भविष्यातही होणार नाही. तंबाखूमध्ये एकही आरोग्य वर्धक गुण नाही. सिगारेट व विडी ओढण्याने ते व्यसन असणाऱ्यांचेच आरोग्य खराब होते. एवढेच नाही तर जे लोक सिगारेट व विडीपासून दूर राहतात त्यानाही त्याचा जास्त त्रास होतो. धुम्रपान करणाऱ्या पेक्षा त्याच्या सोबतीणे राहणाऱ्या व्यक्तीला त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. सिगारेट व विडीपासून निघणारा धूर प्रती वर्षी लाखो नागरिकांना मृत्यूच्या विळख्यात पाठवतो. कर्करोगाने मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू होतो तर काही हृदयविकार व दमा या आजाराने मरण पावतात. वयाच्या २५ व्या वर्षी तोंडातून धूर सोडणाऱ्यांचे आयुष्य १० वर्षांनी कमी होते. याचा अर्थ असा की, व्यक्तीचे आयुष्यमान जर ५५ वर्षे असेल तर तो ४५ वर्षेच जगतो. असे अनुमान डॉक्टरच सांगतात. धुम्रपान करणारी व्यक्ती हृदयाच्या व मेंदूच्या आजाराने त्याच्या आयुष्यातील सुखद क्षण गमावून बसतो. व्यक्तीच्या आयुष्यातील २५ ते ४० वर्षे वयोमर्यादेचा काळ करीअर करण्याचा असतो मात्र, या ऐन उमेदीच्या काळात व्यसनांमुळे व्यक्ती अंथरूणाला खिळलेली असते. कमी वयातच घातक आजार त्याला जडतात व भविष्यात हे आजार वाढणारे असतात.अंजियोप्लास्टी अथवा बायपास सर्जरी करूनही त्याचा फायदा होईलच असे सांगता येत नाही. अंजियोप्लास्टी किंवा बायपास केल्यानंतरही व्यसनावर नियंत्रण ठेवता आले नाही तर व्यक्तीसाठी मृत्युची सर्व कवाडं खुली होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका आरोग्य वर्धक पुस्तकात मी वाचलं होतं की जगभरात तंबाखु सेवनामुळे दर सहा सेकंदाला एक मृत्यू आणि एकट्या आशियात दरवर्षी तंबाखु सेवनामुळे ६ दशलक्ष लोक मृत्यू मुखी पडतात. तंबाखु सेवनामुळे सर्व प्रकारचे. कॅन्सर, हृदयरोग, फुप्फुसाचे रोग होण्याचा मोठा धोका उद्भवतो. मित्रांनो, जग खूप सुंदर आहे. त्यांचा मनमुराद आनंद लुटला पाहीजे. व्यसनाच्या अधीन जाऊन आपल्या हाती फक्त दुःखच पडणार असेल तर कशाला व्यसनाच्या नादी लागायचं. प्लीज व्यसन कुठलही असो, आपल्यासाठी आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या परिवारासाठी आज आपण व्यसन मुक्त होण्याचा संकल्प करूया.
बाकीच्या जगाचे प्रश्न, प्रोब्लेम्स, कटकटी
जरा ठेवू बाजूला....
आणि जरा थेट स्वत:कड़े
पाहु......
Good..👌
ReplyDeleteAwesome Mady.... Keep it up bro...
ReplyDelete👌🏻good motivation 👌🏻
ReplyDeleteThanks
Delete